अटी व शर्ती
←

शेवटचं अद्ययावत: 16-10-2026

आपल मंडळ (aaplemandal.in) ही गणेशोत्सव व सार्वजनिक मंडळांसाठी हिशोब, सदस्य-व्यवस्थापन व सार्वजनिक पान उपलब्ध करून देणारी सेवा आहे. या संकेतस्थळाचा / अ‍ॅपचा वापर करून तुम्ही खालील अटी व शर्तींना संमती देता.

१. सेवेचं स्वरूप

२. खातं व वापरकर्ता जबाबदारी

३. Package, पेमेंट व परतावा

४. सार्वजनिक पान व मजकूर

मंडळाचं सार्वजनिक पान (फोटो, About Us, नियोजन, UPI/QR इ.) मंडळाच्या Admin/Treasurer कडून टाकलं जातं — त्या मजकुराच्या सत्यतेची व कायदेशीरतेची जबाबदारी संबंधित मंडळाची आहे. आक्षेपार्ह किंवा धोरण-भंग करणारा मजकूर आढळल्यास तो हटवण्याचा किंवा संबंधित पान/मंडळ निलंबित करण्याचा अधिकार आपल मंडळ राखून ठेवते.

५. जाहिराती

प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींसंबंधी स्वतंत्र व सविस्तर अटी जाहिरात धोरण मध्ये दिल्या आहेत — त्या याच अटी व शर्तींचा भाग मानल्या जातात.

जाहिरातींबाबत अस्वीकरण व जबाबदारी

पोर्टलवर प्रसिद्ध, प्रदर्शित किंवा प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही जाहिरातीतील मजकूर, माहिती, दावे, आश्वासने, किंमती, उत्पादने, सेवा, ऑफर्स, व्यावसायिक बाबी अथवा इतर कोणत्याही स्वरूपाची माहिती ही संबंधित जाहिरातदाराने उपलब्ध करून दिलेली असून, तिची सत्यता, अचूकता, वैधता, पूर्णता किंवा विश्वासार्हता यासाठी संबंधित जाहिरातदार स्वतः पूर्णतः जबाबदार राहील.

पोर्टल/पोर्टलचे मालक, संचालक, व्यवस्थापन, प्रशासक, कर्मचारी, प्रतिनिधी किंवा संबंधित सेवा प्रदाते हे जाहिरातीतील मजकूर, माहिती, उत्पादने किंवा सेवांची गुणवत्ता, वैधता, उपलब्धता, परिणामकारकता किंवा जाहिरातदाराने केलेल्या कोणत्याही दाव्याची हमी किंवा हमीपत्र देत नाहीत.

जाहिरातीच्या अनुषंगाने जाहिरातदार व ग्राहक/वापरकर्ता किंवा कोणत्याही तृतीय पक्षामध्ये होणारा खरेदी-विक्रीचा व्यवहार, आर्थिक व्यवहार, आगाऊ रक्कम, ऑनलाइन/ऑफलाइन पेमेंट, सेवा पुरवठा, करार, परतावा, नुकसान, फसवणूक, वाद, दावा किंवा अन्य कोणतेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष व्यवहार हा संबंधित पक्षांमधील स्वतंत्र व्यवहार मानला जाईल. अशा कोणत्याही व्यवहारास पोर्टल किंवा त्याचे व्यवस्थापन पक्षकार राहणार नाही.

त्यामुळे जाहिरातीच्या आधारे करण्यात आलेल्या कोणत्याही व्यवहारातून उद्भवणाऱ्या नुकसान, आर्थिक हानी, फसवणूक, विवाद, दावा, देयक, वस्तू/सेवा न मिळणे, चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती अथवा इतर कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामासाठी पोर्टल किंवा त्याचे मालक/व्यवस्थापन कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा उत्तरदायी राहणार नाही.

कोणतीही जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, याचा अर्थ संबंधित उत्पादन, सेवा, कंपनी, संस्था, व्यक्ती किंवा जाहिरातदारास पोर्टलची मान्यता, शिफारस, हमी किंवा अधिकृत समर्थन प्राप्त आहे, असा अर्थ काढता येणार नाही.

जाहिरातदाराने प्रसिद्धीसाठी सादर केलेल्या जाहिरातीतील मजकूर, प्रतिमा, ट्रेडमार्क, लोगो, दावे, माहिती किंवा इतर सामग्रीसाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार, परवानग्या व कायदेशीर अनुपालनाची जबाबदारी संबंधित जाहिरातदाराची राहील. त्यासंदर्भात कोणताही तृतीय-पक्ष दावा किंवा कायदेशीर वाद उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जाहिरातदाराची राहील.

पोर्टलवर जाहिरात देणे किंवा जाहिरात प्रसिद्ध करणे हे कोणत्याही व्यवहाराची हमी किंवा सुरक्षिततेची हमी मानले जाणार नाही. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी वापरकर्त्याने संबंधित जाहिरातदाराची माहिती, उत्पादन/सेवा व व्यवहाराची वैधता स्वतःच्या स्तरावर तपासून आवश्यक ती दक्षता घेणे अपेक्षित आहे.

६. डेटा व गोपनीयता

तुमची व मंडळाची माहिती आम्ही कशी वापरतो/सुरक्षित ठेवतो याबद्दल प्रायव्हसी पॉलिसी बघा. मंडळ कायमचं डिलीट करण्याची प्रक्रिया डेटा डिलीट पॉलिसी मध्ये दिली आहे.

७. जबाबदारीची मर्यादा

सेवा "जशी आहे तशी" (as-is) दिली जाते. तांत्रिक अडचण, सर्व्हर डाउनटाइम किंवा डेटा हानीमुळे झालेल्या अप्रत्यक्ष नुकसानीसाठी आपल मंडळ जबाबदार राहणार नाही. मंडळांनी महत्त्वाच्या हिशोबाचा PDF रिपोर्ट वेळोवेळी डाउनलोड करून स्वतःकडे जपून ठेवण्याची शिफारस केली जाते.

८. अटींमध्ये बदल

या अटी व शर्तींमध्ये वेळोवेळी बदल केला जाऊ शकतो — बदल झाल्यास याच पानावर अद्ययावत तारखेसह दिसेल. सेवेचा पुढेही वापर सुरू ठेवणं म्हणजे बदललेल्या अटींना संमती असं मानलं जाईल.

९. संपर्क

या अटींबाबत काही प्रश्न असल्यास +91 84210 47063 वर कॉल/WhatsApp करा.